भूम-परंडा-वाशी पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा, आ. तानाजी सावंत यांचे वर्चस्व अबाधित

0
74

धाराशिव : भूम, परंडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यांच्या पंचायत समित्यांवरील सभापती-उपसभापती निवडीत आमदार डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तिन्ही पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकला असून सभापतीपदी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत.

या निवडीत आमदार सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी सह इतर पक्ष, तसेच इतर पक्षांनी एकत्रित आव्हान दिले होते. मात्र तिन्ही तालुक्यांत सावंत गटाने आपले स्पष्ट वर्चस्व राखत पंचायत समित्यांवर सत्ता मिळवली.

परंडा पंचायत समितीच्या सभापतीपदी अर्चना जाधव यांची तर उपसभापतीपदी परसु गवारे यांची निवड झाली. भूम पंचायत समितीत झालेल्या चुरशीच्या निवडीत सभापतीपदी पूजा ढगे यांची निवड झाली असून उपसभापतीपदी वंचित बहुजन आघाडीचे रण बागुल विजयी झाले. वाशी पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रणिता गायकवाड तर उपसभापतीपदी नितीन रणदिवे यांची निवड झाली.

सभापती-उपसभापती निवडीनंतर तिन्ही तालुक्यांत शिवसेना कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. गुलाल उधळत व फटाके फोडत कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष व्यक्त केला. या निकालामुळे आमदार सावंत यांची मतदारसंघातील राजकीय पकड पुन्हा अधोरेखित झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here