
परंडा (दि. २८ मार्च) : परंडा-सोनारी रोडवरील खानापूर पाटीजवळ शनिवार, दि. २८ मार्च रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आयशर टेम्पो आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या धडकेत दुचाकीस्वार आश्रुबा मांडवे (रा. कुक्कडगाव, ता. परंडा) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. धडक इतकी जोरात होती की मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, या घटनेमुळे कुक्कडगावसह परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आश्रुबा मांडवे हे आपल्या मोटारसायकल (क्र. MH25 BC 9079) वरून एकटेच परंड्याकडे येत होते. दुपारी २:२० च्या सुमारास ते खानापूर पाटीजवळ पोहोचले असता, समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. संबंधित टेम्पोचे मालक गोविंद वाघ (रा. राळेसांगवी, ता. भूम) हे परंड्याकडून नान्नजजवळ कलिंगड भरण्यासाठी जात होते.
अपघाताची भीषणता इतकी होती की समोरासमोर झालेल्या या धडकेत दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. धडक बसल्यानंतर मांडवे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
पोलिसांची कारवाई : घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे आणि क्षीरसागर यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. अपघातास कारणीभूत ठरलेला आयशर टेम्पो आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
- संजय निंबाळकर व भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश; आ.कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी
- पारगावच्या लॉजवर AHTUचा धडाका!वेश्याव्यवसायावर पोलिसांची थेट कारवाई; परराज्यातील ८ महिलांची सुटका, लॉज मालक-मॅनेजर यांना अटक
- तुळजापुरात सरकारने हिंदुत्व गुंडाळलं, चायनिज कंपनीचे सीसीटीव्ही असलेल्या प्रकल्पाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
- पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- परंड्यात अवैध शस्त्र बाळगणारे दोन अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात; मॅगजिनसह अग्निशस्त्र जप्त