ईट नगरीत कडाडणार शड्डूचा आवाज! खोपेश्वर महादेवाच्या पावन भूमीत रंगणार कुस्तीचा महासंग्राम

0
18


ईट ( सोमेश्वर स्वामी )
बलोपासनेचा दैदिप्यमान वारसा आणि लाल मातीचा अस्सल रांगडेपणा जोपासणाऱ्या भूम तालुक्यातील ईट नगरीत, कुस्तीचा महाकुंभ भरला जाणार आहे. जागृत देवस्थान श्री खोपेश्वर महादेव यांच्या वार्षिक यात्रेचे औचित्य साधून, मंगळवार, दि. ३१ मार्च २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता पी एम श्री जिल्हा परिषद प्रशालेच्या विस्तीर्ण मैदानावर ‘जंगी निकाली कुस्त्यांचा आखाडा’ रंगणार आहे.
या स्पर्धेसाठी मानाची चांदीची गदा अन् लाखांची ईनामे! बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेली आहेत .
या होत असलेल्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात महाराष्ट्रातील दिग्गज मल्ल आपले बाहुबळ पणाला लावणार आहेत. “ईट येथील या भव्य कुस्ती मैदानात पैलवानांसाठी भरघोस बक्षिसांची लयलूट करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम क्रमांकाचे मानाचे बक्षीस माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ भाले यांच्या वतीने ७१ हजार रुपये रोख आणि चांदीची गदा देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पुणे येथील लहुजी सेना कार्याध्यक्ष गणेश थोरात यांच्या वतीने ५१ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस ईट गावचे सरपंच बाळासाहेब वाकडकर यांच्या वतीने ३१ हजार रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच चौथ्या क्रमांकासाठी डॉ. मनोज लासुंडे यांच्याकडून २५ हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकासाठी पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक उमेश पानसरे यांच्या वतीने २१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त ११ हजार रुपयांची बक्षिसे सुनील देशमुख ,गणेश दीक्षित ,अशोक लिमकर , बालाजी हुंबे ,रमेश भोसले , ज्ञानेश्वर डोके ,उमेश सोन्ने , सयाजीराजे हुंबे यांनी दिली आहेत . ५००० हजारांसह अनेक बक्षिसेही या मैदानाचे आकर्षण असणार आहेत.”
कुस्ती शौकिनांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा थरार आपल्या पहाडी आवाजात गुंफण्यासाठी प्रसिद्ध कुस्ती निवेदक युवराज सोलंकर उपस्थित राहणार आहेत.

नियोजन आणि शिस्तबद्ध मांडणी


या भव्य दिव्य आयोजनासाठी सयाजीराजे हुंबे, विनोद वाडकर, अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ईट ग्रामस्थ आणि कुस्ती कमिटी अहोरात्र परिश्रम घेत आहे. पंच कमिटी आणि वस्ताद मंडळींच्या देखरेखीखाली होणाऱ्या या ‘निकाली’ कुस्त्या पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here