आंदोलनाची स्टंटबाजी, कालच तयार होते पत्र तरीही आज आंदोलनाचा हट्ट !पहिल्याच दिवशी संपले महिलांचे साखळी उपोषण

0
615

धाराशिव –
29 ऑक्टोबर रोजी तयार असलेल्या पत्रावर आज 140 कोटींच्या स्थगितीविरोधात असलेले आंदोलन स्थगित करण्यात आल्याने हे आंदोलन होते की स्टंट असा प्रश्न निर्माण झाला असून धाराशिव शहरवासीयांच्या जखमेवर मीठ टाकण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
140 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाला स्थगिती मिळाल्यानंतर शहरात आंदोलनाची धग पहायला मिळाली मात्र भाजपाच्या इच्छुकांनी धाराशिव कृती समितीच्या बॅनरखाली एकत्र येत साखळी उपोषण केले आणि एका दिवसात ते सुटले देखील.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या संबंधित महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता मात्र 18 महिने काम का थांबले? या काळात आंदोलन का केले नाही अशा प्रश्नांना त्या उत्तरे देऊ शकल्या नाहीत. तसेच धाराशिव कृती समिती कधी स्थापन झाली त्या समितीचे पदाधिकारी कोण आहेत याबाबत देखील त्या उत्तर देऊ शकल्या नाहीत.

म्हणे विरोधकांनी दिली कामाला स्थगिती!

140 कोटींच्या कामाला विरोधकांनी स्थगिती दिल्याचा अजब आणि हास्यास्पद दावा उपस्थित महिलांनी केला. रस्त्याची कामे झाली पाहिजेत ही मुख्य मागणी त्यांची होती. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरे देण्याचे टाळले.

त्या व्हायरल मेसेजचा इन्कार

आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला गर्दी जमविण्यासाठी भाजपाच्या वतीने इच्छुक उमेदवार महिलांना उपस्थित राहण्याचे आणि सोबत महिला आणण्याचे टार्गेट देण्यात आल्याचे मेसेज व्हॉटसॲप द्वारे देण्यात आले होते असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते याबाबत भाजप शहराध्यक्ष अमित शिंदे यांना विचारले असता त्यांनी असा मेसेज दिला नसल्याचे सांगितले. तसेच कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असल्याचे सांगितले.

29 तारखेच्या पत्रावर 30 तारखेला आंदोलन सोडले

कृती समितीच्या वतीने जे आंदोलन करण्यात आले होते ते उपोषण सोडताना जे पत्र प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे ते कालचे म्हणजे 29 ऑक्टोबर रोजी तयार करण्यात आले होते. मात्र 29 तारखेच्या पत्रावर 30 तारखेला आंदोलन संपवणे हा अजब प्रकार पाहायला मिळाला.

महाविकास आघाडीचे देखील आंदोलन

महाविकास आघाडीच्या वतीने देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करत आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत 140 कोटीच्या कामांना दिलेल्या स्थगितीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते महाविकास आघाडी आणि भाजप पुरस्कृत आंदोलनकर्ते एकाच ठिकाणी एकत्र आल्याने काही काळ तणावाची वातावरण होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here