धाराशिव (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ तसेच नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या अनुषंगाने १८ डिसेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील वाशी परिसरात धडक देत तब्बल १४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाशी येथे गोवा राज्यात निर्मिती होणारी आणि केवळ तेथेच विक्रीसाठी परवानाधारक असलेली विदेशी दारू अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने सापळा रचला. या कारवाईत महिंद्रा स्कॉर्पिओ (क्रमांक MH-२५-R-३८३५) आणि महिंद्रा XUV ५०० (क्रमांक IIR-५१-AT-९४८६) अशी दोन चारचाकी वाहने तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले.
या प्रकरणी तानाजी अंबऋषी लटके (रा. वाशी) आणि अविनाश नामदेव पवार (रा. वाशी) या दोघांना अटक करण्यात आली असून जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १३ लाख ८१ हजार १२० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त श्रीमती संगीता दरेकर आणि अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्र.निरीक्षक बाळकृष्ण ढोकरे यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने ही मोहीम राबवली.
या कारवाईत आर. के. बागवान, ए.ए. गवंडी, टी.एच. नेर्लेकर, ए.सी. खराडे, ए.डी. गटकांबळे, संतोष कलमले, महिला जवान ऐश्वर्या इंगळे तसेच राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव आणि भुम येथील अधिकारी-कर्मचारी सहभागी होते.
या घटनेचा पुढील तपास प्र.निरीक्षक बाळकृष्ण ढोकरे यांच्या मार्फत सुरू आहे.
- सर्वपक्षीय विरोधकांना टक्कर देत आमदार तानाजी सावंतांनी गड राखला
- विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या रस्त्यावर अपघात; दोन ट्रॅक्टर पलटी, दुकाने व नागरिक थोडक्यात बचावले
- पेट्रोल पंपाला दंड,धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल
- विदेशी दारू तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
- भाजपची हुजरेगिरी करणे महागात पडले, खोटी माहिती पसरवल्याने अखेर तीन सोशल मिडिया पेजवर गुन्हा दाखल, महाराष्ट्रात खळबळ!
