भाजपची हुजरेगिरी करणे महागात पडले, खोटी माहिती पसरवल्याने अखेर तीन सोशल मिडिया पेजवर गुन्हा दाखल, महाराष्ट्रात खळबळ!

0
543

धाराशिव – निवडणूक काळात भाजपची हुजरेगिरी करणाऱ्या तीन सोशल मीडियावर पेजवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून नगरपालिका निवडणुकीत खोटी माहिती प्रसारित करून मतदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

नगरपालिका निवडणुकीदरम्यान पसरवण्यात आलेल्या बनावट एक्झिट पोल प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 10 दिवसानंतर धाराशिव सायबर पोलिस ठाण्यात बनावट एक्झिट पोल वायरल करणाऱ्या धाराशिव 2.0 वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. सोशल मीडियाच्या माध्यमातून एका बनावट टीव्ही चॅनलच्या नावाखाली एका उमेदवाराला विजयी दाखवणारा फेक एक्झिट पोल व्हायरल करण्यात आला होता. मतदानापूर्वी अशाप्रकारे दिशाभूल करणारे साहित्य प्रसारित करणे हे लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951, कलम 126(A) चे स्पष्ट उल्लंघन ठरते. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी ९ डिसेंबर रोजी “तात्काळ FIR करा” असा कठोर आदेश जारी केला होता. ओंकार देशमुख यांनी आदेश काढुनही गुन्हा दाखल होत नसल्याने युवासेना आक्रमक झाली होती. दरम्यान, गुन्हा दाखल झाला नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील युवा सेनेकडून देण्यात आला होता. युवा सेनेच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तात्काळ धाराशिव येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मात्र, आदेश दिल्यानंतरही तब्बल नऊ दिवस कारवाई न झाल्याने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आता सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने प्रकरणात गती येण्याची शक्यता आहे. तरीही, उशीर का झाला? आदेश असूनही FIR त्वरित नोंदवली गेली नाही, यामागे नेमके कोणाचा दबाव होता? असा प्रश्न नागरिकांमध्ये अद्यापही तीव्रतेने कायम आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल तपासणी सुरू करण्यात आली असून बनावट एक्झिट पोल तयार करणारे आणि व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाने धाराशिव नगरपालिका निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजपचा उमेदवार विजयी होत असल्याचा उल्लेख

कायद्याने बंदी असलेल्या बनावट आणि बोगस ओपिनियन पोल मध्ये भाजपच्या उमेदवार विजयी होत असल्याचं दाखवलं होतं एकप्रकारे भाजपची हुजरेगिरी या सोशल मीडिया ने केली होती त्याचा फटका अखेर त्या पेजला बसला आहे.

या कलमानुसार करण्यात आला गुन्हा दाखल

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 126 (A), BNS 2023-223, 337, 353, IT ACT – 66(5) या कलमान्वये धाराशिव 2.0, jlha dharashiv, All about Dharashiv वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवा सेनेच्या पाठपुराव्याला यश

दरम्यान सदर प्रकरणात, युवा सेनेचे तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी फेक एक्झिट पोल प्रकरणात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत धाराशिव चे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना स्वयंस्पष्ट अहवाल देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here