ना शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आला ना शहरातील परिस्थिती बदलली, आ. राणाजगजितसिंह पाटील यांची सत्ता पहिल्या 100 दिवसात सपशेल अपयशी

0
15

धाराशिव – धाराशिवकरांनी नगरपालिकेची सत्ता भाजपच्या म्हणजेच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हातात दिल्यानंतर 29 डिसेंबर रोजी नगराध्यक्ष म्हणून नेहा राहुल काकडे यांनी पदभार स्वीकारला त्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या आणि आपल्या आखलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याप्रमाणेच नगरपालिकेत देखील शंभर दिवसांचा कृती आराखडा जाहीर करू असे सांगितले मात्र सत्ता आणि पदभार स्वीकारल्यानंतर शंभर दिवस उलटून देखील ‘ ना शंभर दिवसांचा कृती आराखडा नेमका कसा आहे हे लोकांना कळले ना शहरातील परिस्थिती बदलली’. मात्र हा कार्यक्रम स्वतः त्यांनीच राबवायचे ठरवले होते त्यातच ते सपशेल अपयशी ठरले असले तरी धाराशिव शहरातील जनतेला होणारा त्रास मात्र कमी झालेला नाही.

याबाबत Facebook वर Dainik Janmat ने ,100 दिवसांत धाराशिव शहरातील परिस्थिती सुधारण्यात आ. राणाजगजितसिंह पाटील यशस्वी ठरलेत की नाहीत काय वाटतं? कमेंट करून सांगा असे विचारले त्यावर नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत.

यावर Anil Pawar म्हणतात की,10.11दिवसाला पाणी पुरवठा चालू आहे जनतेने दाहा दाहा दिवसाचं पाणी कसं प्यावं

Balaji Gaikwad म्हणतात, अजिबात नाही आठवडी बाजारातील अतिक्रमण तसेच आहे एक नाली साफ सफाई केली नाही

Sandeep Gaikwad म्हणतात,प्रशासक असताना पहिले 4 दिवसाला उजनी च पाणी येत होत, आता 10 व्या दिवशी पाणी यायलंय

Sushil Raut म्हणतात, नाही रस्त्याची परिस्थिती जैसे थी तैसीच तसेच उजनी पाणीपुरवठा पाण्याचे नियोजन नाही (अनियमितता) लहान मुलांना साठी बगीचा अभाव

Ajitkumar kale म्हणतात, स्मार्ट सिटी मध्ये एकच नंबर.

Shubham Gaikwad म्हणतात, नगरपालिकेत सत्ता आली की पहिले 4-5 दिवस काम केलेले असे reel टाकले नंतर reelstar सगळे गायब

Pandu Birajdar म्हणतात, 24 तास पाणी आहे चालू 👏

Adv Bapu Salunke म्हणतात यांना फक्त आडवा अडवी करायला सांगा

त्यात हे माहीर आहेत

बाकी रील

बजाओ,

Gajanan Nalawade म्हणतात,मीडियाने संपूर्ण शहर फिरून माहिती घ्यावी

Balaji Kakade म्हणतात, तूर्तास तरी काहीही बदल नाही झाला परिस्थिती जैसे थे तशीच आहे बघूया पुढे काय बदल होतो का

अमर गवळी म्हणतात, काहीच नाही

Somnath Gurav म्हणतात,5000 कोटी रु अजून खर्च व्हायचेय 😂

Rameshwar Magar म्हणतात स्मार्ट सिटी मध्ये एकच नंबर.

तर Hanumant Ingale म्हणतात मला फक्त एक प्रश्न आहे की तेर ला प्रति पंढरपूर म्हटले जाते तेर ची काय अवस्था आहे आणि तेर ला पहिला सिमेंट रस्ता कधी आला धाराशिव चे जाऊ द्या.

आ. राणाजगजितसिंह पाटील गटाची पूर्वी सत्ता असताना पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बसू दिले जात नव्हते तोच कित्ता त्यांनी पुन्हा सत्ता आल्यानंतर गिरवल्याने पत्रकारांपर्यंत माहिती पोहचू दिली जात नाही. नगरपालिकेत भाजपकडे पाशवी बहुमत असल्याने शहरात नागरिकच विरोधकांच्या भूमिकेत या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. “फेसबुकवरील प्रारंभीच्या 30 कमेंटमध्ये एकाही सकारात्मक प्रतिक्रियेचा अभाव असल्याने सत्ताधाऱ्यांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे स्पष्ट होते.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here