परंडा – भजनदास गुडे (दि. ५ एप्रिल) महिला मुख्याधिकाऱ्यांना त्रास देण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे, असा आरोप नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी केला. मागील काही दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्या अनुशंगाने रविवारी दि. ५ एप्रिल रोजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीका केली.
मुख्याधिकारी यांनी शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांना कॅबिन न दिल्याने ते महिला मुख्याधिकाऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप नगराध्यक्ष सौदागर यांनी केला. तर बहुमतात असलेल्या विरोधकांकडे पाणी पुरवठा सभापतीपद आहे. त्यामुळे शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याला विरोधक जबाबदार आहेत. मुख्याधिकारी फोन उचलत नाहीत, दोन महिने पालिकेत आल्या नसल्याचा आरोप तथ्यहीन आहे, असे सौदागर यांनी सांगितले. ऐनवेळी विद्युत पंप नादुरुस्त झाला, त्यामुळे पाण्याचा प्रश्न काही भागात निर्माण झाला होता. मात्र सध्या शहरात कुठेही पाणीटंचाई नसल्याचे नगराध्यक्ष सौदागर यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगरसेवक वाजीद दखनी, बच्चन गायकवाड, माजी नगरसेवक संजय घाडगे, वैभव पवार, रत्नकांत शिंदे, दिलीप रणभोर, जावेद पठाण, शरीफ तांबोळी, मदन दीक्षित, इरफान शेख, सनी राशनकर, रवि भिस्ते, सुनील जगताप, दिपक कडबने, समीर पठाण, राहुल बनसोडे, बालाजी खताळ, अफताब शहाबर्फीलीवाले, जयंत शिंदे, खयुम तुटके, स्वप्निल तळकेर, तन्नु मुजावर, फैसल पठाण आदी उपस्थित होते.
- १३ वर्षांची प्रतीक्षा संपली; तासगाव बायपास रस्ता भूसंपादनाला अखेर गती
- मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने नूतन एमआयडीसीत ₹1100 कोटींची गुंतवणूक होणार – आम.रोहीत पाटील
- शेतीच्या वादातून चुलत्याचा खून; डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
- एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
