धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून काही भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज दि. 16 ऑगस्ट रोजी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
भरणे यांचा पुणे–इंदापूर–धाराशिव हा सुधारित दौरा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. दुपारी 1 वाजता इंदापूर येथून कुर्डुवाडी, बार्शी, येरमाळा मार्गे वाशी (जि. धाराशिव) कडे प्रयाण करतील.
दुपारी साडेतीन वाजता वाशी येथे आगमन करून शहर व लगतच्या परिसरातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी कृषिमंत्री करतील. या दौऱ्यात त्यांच्यासोबत आमदार राहुल भैय्या मोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव असलकर उपस्थित राहणार आहेत.
यानंतर सायं. साडेपाच वाजता भरणे वाशी येथून पुन्हा इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे प्रयाण करतील. रात्री 8 वाजता तेथे पोहोचून मुक्काम करतील.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी भरणे यांच्या दौऱ्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
- रामदास आठवले यांची जाणीवपूर्वक विनोदी प्रतिमा तयार करून आंबेडकरी चळवळीचे नुकसान वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रा. सुषमा अंधारे यांची दीर्घ पोस्ट
- सर्वपक्षीय विरोधकांना टक्कर देत आमदार तानाजी सावंतांनी गड राखला
- विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या रस्त्यावर अपघात; दोन ट्रॅक्टर पलटी, दुकाने व नागरिक थोडक्यात बचावले
- पेट्रोल पंपाला दंड,धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल
- विदेशी दारू तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
