सोलापूर–पुणे महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली असून, धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची कार एका भरधाव कंटेनरला धडकली. अपघात अत्यंत भीषण असतानाही सावंत सुखरूप बचावले, तर चालक आणि सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंत हे बुधवारी मुंबई येथे झालेल्या भाजप प्रवेश सोहळ्यानंतर आपल्या फॉर्च्युनर (MH 12 SE 5559) वाहनाने परंड्याकडे परतत होते. गुरुवारी (दि. १९) मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास भिगवणजवळील डाळज २ गावाच्या हद्दीत त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या कंटेनरने (MH 12 WJ 6374) जोरदार धडक दिली.
या अपघाताची तीव्रता इतकी होती की फॉर्च्युनर गाडीचा चालक बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. मात्र, सुदैवाने सावंत यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. अपघातात चालक आणि सुरक्षारक्षक जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, सावंत हे महाराष्ट्राचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे असून, त्यांच्या सुरक्षिततेमुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.
- घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या हॉटेलवर तहसील प्रशासनाची कारवाई, गुन्हा दाखल
- भाजप नेते धनंजय सावंत यांच्या गाडीला अपघात
- आ.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळाचे वाटप
- प्रशासनाला बदनाम करणाऱ्या उपोषणकर्त्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचे निर्देश
- भूम-परंडा-वाशी पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा, आ. तानाजी सावंत यांचे वर्चस्व अबाधित
