४ हजाराची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत च्या जाळ्यात

0
113

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहायक उपनिरीक्षक गोकुळ बाबुराव गिरी,वय 58, यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की तक्रारदार , त्यांचे भाऊ व वडील यांचे विरूद्ध पोलिस स्टेशन तामलवाडी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथे दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्य क्र.252/2021 मध्ये  तक्रारदार त्यांचा भाऊ व वडिल यांचेवर कारवाई न करण्यासाठी यातील गिरी यांनी 4000/रुपयांची मागणी करून 4000/रूपये स्वीकारण्याचे मान्य केले व पांचासमक्ष 4000/ रूपये स्वीकारले असता ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई – अशोक हुलगे , पोलीस निरीक्षक, ला प्र वि उस्मानाबाद यांनी डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद रुपचंद वाघमारे–प्रभारी अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. औरंगाबाद प्रशांत संपते  — पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि. उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनात केली.त्यांना पोलीस अंमलदार अर्जुन मार्कड, मधुकर जाधव, शिद्धेस्वर तावसकर, चालक दत्तात्रय करडे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here