स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला टाकून आंदोलन

0
107

 

उस्मानाबाद

 भाजीपाला आणि दुधाला भाव नसल्याने या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला टाकत आंदोलन केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात  म्हटले आहे की सर्व भाजीपाला पिकाचे व दुधाचे दर प्रचंड प्रमाणात घसरले आहेत. बी बियाणे खते औषधे मजुरी याचा विचार केला तर शेतकऱ्याने जगायचे कसे?काही वर्षांपूर्वी कांद्याला किलोला अनुदान दिले होते त्याप्रमाणे सर्व भाजीपाला पिकांना किलोला 10 रुपये अनुदान, हेक्‍टरी एक लाख रुपये अनुदान द्या, कोरोनामुळे शेतकरी इतका वाईट अवस्थेत जगत आहे की त्यांच्या भावनेचा उद्रेक केव्हा होईल कोणती परिस्थिती निर्माण होईल सांगता येत नाही यासाठी आपण ठोक उपाययोजना केल्या नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनाला जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, तानाजी पाटील, मारुती दळवी, विष्णू काळे, उमेश चव्हाण नेताजी, जमदाडे, भोजने राजेंद्र ढोक, ओंकार कानडे आदी पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here