सुरतगाव ते काटी या निकृष्ट कामाबाबत निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेता निवेदनाला दाखवली केराची टोपली…
सावरगाव (प्रतिनिधी)
तुळजापुर तालुक्यातील सुरतगांव ते काटी या १५ किमी लांबीच्या रस्ता कामाच्या दर्जा बाबत वरीष्ठ कार्यालयाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही ,या मार्गावर करण्यात येणाऱ्या पुलाचे बांधकाम वाळु ऐवजी दगडाचा डस्टमध्ये केले जात आहे,गेल्या मे महीन्यापासुन सुरतगांव ते काटी या१५ किमी मार्गाच्या कामाला ठेकेदाराने कामाला प्रारंभ केला आहे,साइटपट्टयाचे खोदकाम करून त्या भरण्यात येणारा मुरुम माती मिश्रीत लालसर भरला जात होता, त्यासंदर्भात सावरगावचे चंद्रोदन माळी यांनी लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांचे सह लोकप्रतिनिधीकडे केली मात्र त्या मुरूमाचा अहवाल प्रयोगशाळेने चांगल्या प्रतिचा दाखवला व तसे प्रमाणपत्र ठेकेदाराला बहाल केले, पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे सिमेंट पाईप आय एसआय प्रमाणित नाहीत, हे निदर्शनास आल्या नंतर ठेकेदाराने पाईप बदलले , सध्या पुलाचा बांधकाम साठी वाळुचा वापर न करता डस्ट पावडर मधे काम पुर्ण करण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडुन केला जात आहे, १५ कि मी लांबीच्या रस्त्याच्या कामात दर्जा तपासण्याची मागणी चंद्रोदन माळी यानी केली. तरी अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत तर पावसाळ्याचे दिवस असल्याने पाणी चिखलाने काळीमाती रोडवर आल्याने वहातुकीला मोठी अडचण ठरत आहे ,सध्या रस्त्यातुन मार्ग शोधत प्रवाशी वाहतुक करीत आहेत
वाळु ऐवजी डस्टचा वापर का ?
रस्ता व पुलाचा अंदाजपत्रकात वाळु ऐवजी क्रशन्ट वापरण्याची परवानगी असताना ठेकेदार हा ठरवुन दिलेल्या अटीप्रमाणे साहीत्याचा वापर न करता खडी क्रेशर वरील दगडी पावडरचा वापर करून बांधकामे उरकण्याचा प्रयत्न करीत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता झगडे गायकवाड हे याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप गावकऱ्यातुन केला जात आहे
चंद्रोदन माळी
(सामाजिक कार्यकर्ता सावरगाव)