सांगली जिल्ह्यात आणखी आठ जण कोरोना बाधित,जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांची माहिती

0
111

तासगाव प्रतिनिधी दि.३०
जिल्ह्यात आणखी आठ जण कोरोणाबाधित झाले असून यामध्ये औंढी तालुका जत येथील ५५ वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे .सदर व्यक्ती १६ मे रोजी मुंबईहून आलेली आहे.
खानापूर तालुक्यातील कारंजे येथील ३० वर्षिय पुरुष कोरोणा बाधित झाला असून सदर व्यक्ती १८ मे रोजी मुंबईहून आलेली आहे.
नेर्ली येथील काल कोरोणा पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा २८ वर्षिय मुलगाही कोरोणा बाधित झाला आहे.
 रेड तालुका शिराळा येथील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा निकटवर्तीय २० वर्षीय पुरुष नातेवाईक कोरोणा बाधित झाला आहे.
 खिरवडे तालुका शिराळा येथील कोरोणा बाधित व्यक्तीच्या निकटवर्तीय ५२ वर्षीय महिला कोरोना बाधित झाली आहे.
 कचरेवाडी तालुका तासगाव येथील २८ वर्षीय पुरुष कोरोना बाधित झाला आहे.
 आंबेगाव तालुका कडेगाव येथील कोरोना बाधित झालेल्या रुग्णाची बारा वर्षीय मुलगी तसेच नऊ वर्षीय मुलगा ही कोरोना बाधित झाला आहे.
अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here