श्री बाबुराव लठ्ठे विद्यामंदिरचे पत्रे उडून गेले; वीस लाखाचे नुकसान

0
73



 कुची,दि.2 (जगन्नाथ सकट)

 शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे  कवठेमंहाकाळ तालुक्यातील कुची येथील श्री बाबुराव लठ्ठे विद्यामंदिरचे पत्रे उडून गेल्याने सुमारे वीस लाखांपर्यंत नुकसान झाले आहे.अशी माहिती हायस्कूल चे मुख्याध्यापक व्ही.टी.पाटील यांनी दिली.दरम्यान यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि शुक्रवारी दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर  सायंकाळी सहाच्या सुमारास वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.या झालेल्या अतिवृष्टीमुळे  

कुची येथील श्री बाबुराव लठ्ठे विद्यामंदिरचे तीन खोल्यांचे सुमारे सत्तर ते ऐंशी पत्रे ऑगलसह सुमारे सत्तर ते ऐंशी फुटापर्यंत लांब उडून गेले त्याचबरोबर फर्निचर,पुस्तके,इतर शैक्षणिक साहित्य यांचे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती मिळताच मुख्याध्यापक व्ही. टी.पाटील,संतोष पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय शिंदे यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली.तसेच गट शिक्षण अधिकारी विश्वास साबळे,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सांगली विभागप्रमुख एस. व्ही.पाटील यांनीही भेट देऊन पाहणी केली. गावकामगार तलाठी बी.ए.माने यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला.या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.इमारत पुन्हा उभारण्यासाठी,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व नुकसान भरुन काढण्यासाठी संस्था,प्रशासन व ग्रामस्थांनी व आमदार खासदार या लोकप्रतिनिधींनी जास्तीत जास्त सहकार्य करावे.अशी अपेक्षा कुची येथील पालकांनी ग्रामस्थांनी व्यक्त करीत आहेत यावेळी कुची येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here