श्रीपतराव भोसले विद्यालयात ‘भागिरिथी युवा महोत्सवास’ उत्साहात प्रारंभ

0
121

पहिल्या दिवशी रंगले मैदानी सांघिक खेळ
उस्मानाबाद: येथील श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षी प्रमाणे साजरा होणा-या भागिरिथी युवा महोत्सवाची आज विविध मैदानी खेळांनी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. भागिरिथी युवा महोत्सवाचे हे 3रे वर्ष आहे.

यावेळी कबड्डी, थ्रोबाॅल, रस्सीखेच, खो खो स्पर्धांचे उद्घाटन होऊन कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी खेळांमधील कौशल्य दाखविले. शिक्षकांमधील झालेल्या कबड्डीच्या विशेष सामन्याने सर्वांचे लक्ष वेधले.

यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, मुख्याध्यापक सुधीर पडवळ, उपप्रशासकीय अधिकारी संतोष घार्गे, कला विभाग प्रमुख प्रा.नंदकुमार नन्नवरे, पर्यवेक्षक  प्रा.तानाजी हाजगुडे, प्रा.अरविंद भगत, प्रा.मेघमाला देशमुख, प्रा.सविता जाधव आणि विद्यालयातील सर्व शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती.

आठवडाभर चालणा-या या महोत्सवात मैदानी स्पर्धांसोबतच वैयक्तिक स्पर्धा, आनंद मेळा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम होऊन इ.12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

 आजच्या क्रीडास्पर्धांच्या यशस्वीततेसाठी क्रीडा शिक्षक प्रा.विवेक कापसे, प्रा.मनोज डोलारे, प्रा.रविंद्र माने, अमित लोमटे, प्रा.मोहन शिंदे, प्रा.प्रसाद माशाळकर, प्रा.सचिन तेली यांनी अथक परिश्रम घेतले. या स्पर्धांमध्ये मोठ्या सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आनंद लुटला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here