शालिनी (काकी) चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन

0
105

उस्मानाबाद –  महाराष्ट्र राज्याचे माजी दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या धर्मपत्नी शालिनी चव्हाण यांचे वृद्धापकाळाने पुणे येथील हॉस्पिटल मध्ये निधन झाले. 

त्या 82 वर्षांच्या होत्या.शालिनी चव्हाण दोन महिन्यापासून आजारी होत्या. त्यांच्यावर वेगवेगळ्या इस्पितळांमध्ये औषध उपचार सुरू होते पण वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती औषध उपचारास साथ देत नव्हती.

उपचार सुरू असतानाच आज रात्री साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा अंत्यविधी मंगळवारी दुपारी दोन वाजता त्यांच्या अणदूर येथील शेतामध्ये करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुनील चव्हाण जिल्हा परिषदेचे सदस्य बाबुराव चव्हाण ही दोन मुलं आणि एक मुलगी यांच्यासह सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here