विविध सामाजिक उपक्रमाने बेंबळी येथील शिवजयंती साजरी

0
114

कनगरा/प्रतिनिधी
                उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे शिवजयंती निमित्त,शिवजन्मोत्सव सोहळा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘नाचून नव्हे तर वाचून’ शिवजयंती साजरी करीवी असा संदेश कृतीतून दिला.
                 तसेच सरस्वती माध्यमिक विद्यालयात गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होते’ या पुस्तकावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेत सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला होता.यात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व रोख अश्या स्वरूपाचे पारितोषिक देण्यात आले.गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम शाळेत राबवला जात असून या उपक्रमासाठी बेंबळी येथील ‘शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे’ अध्यक्ष तानाजी खापरे पाटील यांनी परिश्रम घेतले होते.
            यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील गिरवलकर,सहशिक्षक मोहन पाटील,मधुसूदन तानावडे,रज्जाक शेख,शिवाजी माने,मनोज होळे ,काशिनाथ अरळे,भारत पाटील,बंडू फ़स्के व मोहसीन पठाण आदि शिक्षकांसह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here