येरमाळा पो.स्टे. चे सहाय्यक पो.निरीक्षक गणेश मुंढे व इतर एकावर ए सी बी ची कारवाई

0
105


उस्मानाबाद – येरमाळा पो.स्टे. चे सहाय्यक पो.निरीक्षक गणेश मुंढे व  इतर एकावर निनावी अर्जावर कार्रवाई न करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक, उस्मानाबाद विभागाने कारवाई केली आहे.

तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेल्या निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी आरोपी लोकसेवक गणेश मुंढे, स.पो.नि. पो.स्टे. येरमाळा यांनी  रत्नापुर येथील पोलीस पाटील सुशन जाधवर यांचे मार्फ़तीने तक्रारदार यांच्याकडे दि.22/8/2021 रोजी एक लाख रुपये लाचेची मागणी करून तड़जोडी अंती दोन्ही आरोपी यांनी 70000/- रुपये लाच रक्कम स्वीकारल्याचे पंचांसमक्ष मान्य केले होते.आरोपी यांची लाचमागणी पडताळणी केल्यानंतर आज रोजी त्यांच्या विरुद्ध पो.स्टे. येरमाळा येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.सदरची कार्यवाही डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद व प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि. उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.अशोक हुलगे, पोलीस अंमलदार अर्जुन मार्कड,विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर,विशाल डोके, अविनाश आचार्य यांनी केली.लाचेसंबंधी तक्रार असल्यास प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद यांच्याकडे मोबाइल क्र.95279 43100 ,कार्यालय क्र.02472 222879 किंवा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here