मोहा येथे दोन समाजामध्ये तणाव, तणावाचे रूपांतर दंगलीत व दगडफेकीत

0
246

दगडफेकीत अनेक पोलीस व ग्रामस्थ जखमी,  वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सतर्कतेने तणावपूर्ण शांतता


मोहा – दिनांक 25 ऑगस्ट रोजी सोमवारच्या सांयंकाळी
पारधी समाजातील व्यक्तीचे निधन झाले असता. दफन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्मशान भूमिमध्ये घेऊन गेले परंतु वनविभागाने रेकॉर्डली स्मशानभूमीसाठी दिलेली पाच गुंठे जागा सोडून इतर जागेत दफन केले. आणि त्याच जागेत मोहा गावाचा सिमोलंघनाचा कार्यक्रम होत असतो. पारधी समाजाने स्मशानभूमीची जागा सोडून ज्याठिकाणी कार्यक्रम होतो त्याच ठिकाणी दफन केले. आणि इथेच दोन समाजातील तेढ निर्माण होण्याचे कारण बनले.
  
  

दंगलीचे कारण ठरले स्मशानभूमीची जमीन

वनविभागाच्या आखत्यारीत असलेली जमीनी पैकी कागदोपत्री पाच गुंढे जमीन ही पारधी समाजाच्या स्मशानभूमीसाठी देण्यात आलेली असताना. पारधी समाजाने उर्वरित जागा अतिक्रमित करण्याचा घाट घातल्याचे दिसून आल्याने गावातील नागरिकांनी त्यांना अटकावं केला. त्याला कारणही तसेच आहे. गेली अनेक वर्षांपासून मोहा गावातील सिमोलंघांनाचा कार्यक्रम त्या जागेत होत आहे. आणि त्याच जागेत मयत व्यक्तीचा अंत्यविधी केला त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या.
त्यावेळी दोन्ही समाजाने चर्चेअंती नियमानुसार तोडगा काढू असे ठरवून सोमवारची रात्र घालवली. परंतु सोमवारची शांतता ही मंगळवारच्या वादळपूर्वीची शांतता ठरली.

कायदा सुव्यवस्थेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त

मंगळवारी सकाळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त केला व दोन्ही समाजातील वातावरण निवळण्याचा चांगला प्रयत्न झाला. पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
रेकॉर्डनुसार सर्वकाही चालू असताना अचानक पारधी समाजातील काही लोकांनी दगडफेक सुरु केली.
जवळच असलेल्या गलोलीने दगडाचा वर्षाव सुरु केला.
दरम्यान पोलीस प्रशानाने थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु
दगडाचा वर्षाव व वेग भयानक असल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. यामध्ये पोलीस प्रशासनाचे अधिकारी व शिपायी
जखमी झाले. तर गावातील नागरिकांची डोकी फुटली, काहींच्या हातांना, पायांना, इजा झाल्या. जखमीवर गावातीलच आरोग्य केंद्रात उपचार केले.
    

सध्या मोहा येथे तणावपूर्ण शांतता


दुपारी मोहा गावात दंगलीचे स्वरूप आले होते. परंतु सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने अधिकची कुमक मागवून घेतली. व परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सद्या मोहा गावात तणावपूर्ण शांतता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here