बेंबळी परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

0
109

कनगरा(अमोल गायकवाड)
              उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी परिसरात मोठ्या प्रमाणात शेतीपूरक जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय केला जातो.परंतू सध्या समाज माध्यमातून ब्राॅयलर कोंबड्यांना कोरोना व्हायरस झाल्याची अफवा फिरत असल्याने अशा चुकीच्या माहितीमुळे पाॅल्ट्री व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
              तसेच कनगर्‍यात चार,बेंबळीत सहा,महाळंगी आठ,टाकळीत चार,केशेगांव तीन,नांदुर्गा दोन,धुत्ता एक आदि गावात पाॅल्ट्री फार्म असून एकट्या बेंबळीत ५०० किलो पर्यंत चिकनची दिवसाला विक्री होत असे परंतू सध्या समाज माध्यमातून फिरत असलेल्या चुकीच्या माहितीमुळे या व्यावसायावर मोठा परिणाम झाला असून पुर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात विक्री घटली असून चिकनच्या किंमतीही कमी झाल्या असल्याने हा व्यावसाय निव्वळ तोट्यात आला आहे.यामुळे शेतकर्‍यांच्या मका मालावरही याचा परिणाम झाला असून मका पुर्वी २८-३० रुपये किलो प्रमाणे विकायची तर सध्या ती १५-१६ रुपये किलो प्रमाणे विकत असून शेतकर्‍याने तर कोणता जोडधंदा करावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बॅंकेतून कर्ज काढून पाॅल्ट्रीची उभारणी केली असून बॅंकेच्या हप्त्याची परतफेड कशी करावी?हा प्रश्नही पाॅल्ट्री व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे.या विषयावर बोलत असताना अॅड.अजय पाटील म्हणाले,समाज माध्यमातून पोस्ट टाकणार्‍या विरोधात कायदेशीर कारवाईची गरज आहे.तसेच कोंबड्यांना कोरोना व्हायरस झाल्याची नोंद कोठेही झाली नसून अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here