उस्मानाबाद
बळीराजा पार्टीच्या वतीने २५ ऑक्टोबर रोजी विमा कंपनीच्या उस्मानाबाद शाखेस ताळे ठोको आंदोलन करण्यात येणार आहे. सन २०२० मधील पिक विमा मोबदला बजाज इन्शुरंन्स कंपनी हा मोबदला देण्यास टाळाटाळ करत आहे बळीराजा पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी ही निवेदने देण्यात आली आहेत या निवेदनाची दखल घेतली नसल्याने हे आंदोलन करण्यात येणार आहे. या टाळे ठोक आंदोलनास रामचंद्र पाटील प्रणित शेतकरी संघटना,आम आदमी पार्टी, भारतीय एकता पार्टीने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे