पिकअपला ट्रकची धडक 1 जखमी दोघांनी सोडला जगेवरच प्राण

0
103

उस्मानाबाद – शहरातील औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर डी मार्ट नजिक ट्रकने पिकअप दिलेल्या धडकेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.
याबाबत माहिती अशी की उस्मानाबाद तालुक्यातील घोगरेवाडी येथील युवक तुळजापूरला भाजीपाला खरेदी करण्यासाठी निघाले होते. पिकअप (एम-एच 24 जे 5906 डी) डी मार्ट जवळ आल्यानंतर ट्रक ( एम एच 12 एच बी 6645) ने मागून जोरात धडक दिली. या अपघातात  दादासाहेब व्यंकट झांजे( वय 20) व रमेश श्रीकृष्ण झांजे (वय 21) हे मृत झाले असून सुरज शिवाजी साळुंखे (वय 26) हे जखमी आहेत. अपघात सकाळी सातच्या सुमारास घडल्याने प्रत्यक्षदर्शी कोणीच नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here