पारा (राहुल शेळके ): वाशी तालुक्यातील पारा व परिसरात 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच राजेंद्र काशीद, जि. प. के. प्रा. शाळेत मुख्याध्यापक जोगदंड, वि. का. सेवा सहकारी सोसायटीत चेअरमन बाळासाहेब भराटे, औट पोस्ट पारा येथे जमादार मोहसीन खान पठाण, जय भवानी विद्यालयात मुख्याध्यापक दिलीप मोरे, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. अमर तांबडे, ग्रामीण विध्यालय लाखणगाव येथे संस्थेचे अध्यक्ष सुरेश लाखे पाटील , जि. प. शाळा लाखणगाव येथे मुख्यध्यापक संतोष झांबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच या कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमात गावातील मंडळी, विध्यार्थी, पत्रकार उपस्थित होते.