शिक्षक घरफोडी प्रकरणी श्वान व ठसे तज्ञ घटनाथळी…..
श्वान घरपरिसरात घुटमळले, चोरांचा तपास करणे पोलीसांसमोर आव्हान
परंडा ( दि १९ ) परंडा येथील समर्थनगर सोसायटीमध्ये राहणारे शिक्षक इंद्रजित चंद्रभान मुळीक यांच्या घरघोडी प्रकरणातील आरोपीचा तपास करण्यासाठी शनिवार दि १९ रोजी उस्मानाबाद चे श्वास पथक,व ठसे तज्ञाचे पथक पाचारण करण्यात आले होते .
उस्मानाबाद च्या श्वान पथकातील प्लुटो नावाच्या डाबरमन श्वानाला घटनास्थळाचा वास देऊन पथकातील पोलिस कर्मचारी ढोणे,हावळे, यांनी आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र घरातील व्यक्तींचा हात लागला असल्याने श्वान घरपरिसरात घुटमळले त्यामुळे माग काढता आला नाही.ठसे तज्ञाच्या पथकाने ठस्याचे नमुने घेतले आहेत. पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार ससाने,पो.उप निरिक्षक दादासाहेब बनसोडे पोलिस कॉन्स्टेबल शेख,पोलिस कॉन्स्टेबल शेंदारकर,पोलिस कॉन्स्टेबल गायकवाड,पोलिस कॉन्स्टेबल भोसले,महिला पोलिस नाईक यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे .
शुक्रवार दि १८ जुन रोजी भरदिवसा दुपारी २ वाजेच्या सुमारास समर्थ नगर सोसायटी येथील शिक्षक इंद्रजीत मुळीक यांच्या घराच्या दरवाज्याची कडी तोडून अज्ञात चोरांनी कपाटातील दीड लाख रुपये रोख व १ तोळ्याचे २ व अर्धा तोळ्याचे २ असे तिन तोळ्याच्या ४ अंगठ्या व चांदीचे पंचपाळ व पायातील चांदीचे पैंजण असा एकुन २ लाख २६ हजाराचा माल चोरून नेला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की शिक्षक मुळीक हे पाहुण्यांचे मासिक असल्याने दि १८ रोजी कळंब तालूक्यातील गौर येथे गेले होते,घरी इंद्रजीत यांचा मुलगा धिरज एकटाच होता अभ्यास केल्या नंतर मुलगा रूई येथे चुलत्याच्या घरी १२ वाजेच्या सुमारास घराला कुलूप लाऊन जेवणासाठी गेला होता . जेवण करून रुई येथून आल्यावर त्याला घराच्या दरवाज्याची कडी तुटलेली दिसली व घरातील कपाट उघडे दिसल्याने त्यांला घरात चोरी झाल्याचे दिसुन आले .त्याने फोनवर वडिलांना माहिती दिली इंद्रजित मुळीक यांनी परंडा येथे घरी येऊन पाहिले असता कपाटातील दीड लाख रुपये व सोन्याच्या अंगठ्या व चांदीचे दागीन्याची चोरी झाल्याचे दिसुन आले .इंद्रजित मुळीक हे करमाळा तालूल्यातील गौडरे येथे खाजगी संस्थेवर शिक्षक आहे त्यांचा मोठा मुलगा मेडीकल कॉलेज मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे .मुलाची फी भरण्या साठी त्यांनी पैसे कपाटात आणुन ठेवले होते.या प्रकरणी धिरज मुळीक यांच्या फिर्यादी वरून परंडा पोलिसात अज्ञात चोराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या चोरीप्रकरणाचा तपास पोलिस उप निरीक्षक दादासाहेब बनसोडे करीत आहेत

