परंडा शहरातील एकाच कुटुंबातील चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

0
103

परंडा (दत्ता नरुटे)
परंडा येथील पोलीस वसाहतीत सोलापूर येथून आलेल्या दोघांचे  कोविड19 रिपोर्ट दोन दिवसांपूर्वी  पॉझिटिव्ह आले होते शनिवारी रात्री त्याच कुटुंबातील आणखी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे
परंडा येथील पोलीस कॉलनीत सोलापूर येथून दोघे आले होते परंडा  आल्यानंतर त्यांना सर्दी,ताप आल्याने  दवाखान्यात दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांचे स्वाब लातूर येते पाठवण्यात आले शुक्रवारी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात दोन दिवस जनता कर्फ्यु लावण्यात आला  त्यांचं कुटुंबातील आणखी तिघांचे स्वाब पाठवण्यात आले होते त्यापैकी  दोघाचे रिपोर्ट शनिवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले यामध्ये 54 वर्षीय पुरुष व 29 वर्षीय युवकाचा समावेश आहे पहिल्या रिपोर्ट मध्ये माय-लेकरं तर दुसऱ्या रिपोर्ट मध्ये बाप लेक पॉझिटिव्ह आल्याने परंडेकरांच्या चिंतेत भर पडली आहे तर एकाच कुटुंबातील रुग्णांची संख्या चार इतकी झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here