परंडा तालुक्यात सीना काठी बिबट्या सदृश प्राण्याचा वावर

0
111
  • पिठापुरी येथील खरात वस्तीवर केला कोंबड्यावर हल्ला 

पाच कोंबड्या केल्या फस्त

परंडा ( दत्ता नरुटे)
परंडा तालूक्यातील पिठापुरी च्या खरात वस्तीवर बिबटयाने धुमाकुळ घालत 8 ते 9 कोंबडया मध्य रात्री फस्त केल्या आहेत
कोंबडयाचा अवाज आल्याने ग्रामस्थांनी घरा बाहेर येऊन पाहिल्यास बिबट्या सारखा दिसत असल्याचा  दावा केला असुन ऊसाच्या फडात दडून बसला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असुन परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे .

या प्रकरणी परंडा पोलिसांना फोन वरून माहिती दिल्याने तात्काळ वन विभागाचे कर्मचारी वनरक्षक बाजीराव साळुंके , प्रमोद कांबळे , दशरथ साळुंके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली अज्ञात वन्य प्राण्याच्या पायाचे ठश्याचे फोटो आधिकाऱ्यांना पाठविले असुन ठसे कोणत्या प्राण्याचे आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी परंडा ,माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे

रात्री 12 च्या सुमारास कोंबड्या ओरडण्याचा आवाज आल्याने मी उठून बाहेर आलो असता वाघासारखा दिसणारा प्राणी दिसला त्याने आमच्या 8 ते 9 कोंबड्या खाल्ल्या आहेत सकाळी वन विभागाचे कर्मचारी यांनी शेतातील ठसे पाहिले असून ते ठसे कशाचे आहेत हे समजले नाही अशी प्रतिक्रिया समाधान खरात यांनी दै जनमत शी बोलताना दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here