
परंडा( प्रतिनिधी )परंडा उपजिल्हा रुग्णालयात सिक्युरिटी गार्डची नौकरी करीत असलेले माजी सैनिक राजेद्र उदागे व वरिष्ठ लीपीक शंकर सोंडगे यांचा कारगील विजय दिनाचे औचित्य साधून परंडा उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधिक्षक डॉ.विश्वेश कुलकर्णी यांच्या हस्ते दि. २६ जुलै रोजी सत्कार करण्यात आला.
१९९९ ला कारगिल युद्ध झाले तेव्हा मेजर शंकर सोंडगे हे या युद्धा मध्ये समर्पणाने लढले. त्यांचे शौर्य,धाडस,त्याग यामुळेच पुन्हा आपला देश हा सुरक्षित झाला व कश्मीर पुन्हा भारताकडे आले.असे देशाची सेवा केलेले वीर जवान माजी सैनिक शंकर सोंडगे हे उपजिल्हा रुग्णालयात वरिष्ठ लीपीक पदावर तर माजी सैनिक राजेद्र उदागे हे परंडा उपजिल्हा रुग्णालय येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत.
परंडा उपजिल्हा रुग्णालय यांच्या वतीने या दोन्ही माजी सैनिकांचा वैद्यकीय अधीक्षक डॉ.विश्वेश कुलकर्णी यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,फेटा,पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी डॉ.ऑफीस
सुपरटेंडंट पवार साहेब,आनंद मोरे,डॉ.ठाकुर मॅडम,अमोल बांबूरकर,चंद्रभान पवार,तानाजी गुंजाळ,किशोर जगताप, रक्त पुरवठा विभाग सोनल कुकडकर, हॉस्पिटल इन्चार्ज श्रीमती कुलकर्णी मॅडम आदी उपस्थित होते.
- संजय निंबाळकर व भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश; आ.कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी
- पारगावच्या लॉजवर AHTUचा धडाका!वेश्याव्यवसायावर पोलिसांची थेट कारवाई; परराज्यातील ८ महिलांची सुटका, लॉज मालक-मॅनेजर यांना अटक
- तुळजापुरात सरकारने हिंदुत्व गुंडाळलं, चायनिज कंपनीचे सीसीटीव्ही असलेल्या प्रकल्पाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
- पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- परंड्यात अवैध शस्त्र बाळगणारे दोन अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात; मॅगजिनसह अग्निशस्त्र जप्त