निवडणूकीच्या तोंडावर तुळजापूर मतदार संघात मधुकर चव्हाण यांच्या अडचणीत वाढ होत आहे. तालुक्यातील फुलवाडी येथील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि तंटामुक्त गाव समिती अध्यक्षाससह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसला अखेरचा रामराम ठोकला आहे. आमदार मधुकर चव्हाण यांच्या नेतृत्वाला झुगारून डॉ. पद्मसिंह पाटील व महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्रित भाजपात प्रवेश केल्यामुळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना समर्थन देत तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या ग्रामपंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. आमदार मधुकर चव्हाण यांच्या नेतृत्वाला त्यानिमित्ताने मोठा हादरा बसला आहे.
सरपंच मधुकर हजारे, उपसरपंच सुभाषचंद्र कुताडे, माजी सरपंच वसंत जाधव, संजय हांडगे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज हिप्परगे यांच्यासह गुणवंत लंगडे, सुभाष जाधव, राजेंद्र राठोड, चंद्रकांत लोहार, राजेंद्र धबाले, शांतीर हांडगे, काशीनाथ हांडगे,शेखर हांडगे, बळीराम
हिप्परगे, अविनाश हिप्परगे, मारूती हिप्परगे, संतोष हिप्परगे, अनिल हिप्परगे, जितेंद्र हिप्परगे, राजेंद्र हिप्परगे, धनाप्पा धबाले, शंकर धबाले, सोमनाथ धबाले,विजय धबाले, सुग्रीव कवडे, नागनाथ पांचाळ, नितीन राठोड, प्रकाश चव्हाण, बालाजी लंगडे, महादेव कुताडे,अर्जून कुताडे, सोमनाथ कुताडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉ. पद्मसिंह पाटील, उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी भाजपाचे वसंत वडगावे, विक्रमसिंह देशमुख, दीपक आलुरे, साहेबराव घुगे, मल्लिनाथ जेवळे,यशवंत लोंढे, काशिनाथ शेटे, दयानंद मुंडके यांची प्रमुख उपस्थिती होती.