प्रतिबंधासाठी तालुकानिहाय समित्या गठीत
धाराशिव, दि. ५ मार्च (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील ढोकी गावात मृत कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू (H5N1) आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. चिकन सेंटर आणि परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे अहवालही सकारात्मक आल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी तालुकानिहाय प्रतिबंधात्मक समित्या गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. बाधित भागात पोलिस बंदोबस्त, निर्जंतुकीकरण आणि कुक्कुट पक्ष्यांच्या विल्हेवाटीची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे.
प्रमुख उपाययोजना:
- तहसीलदार (अध्यक्ष) – नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाययोजना.
- गटविकास अधिकारी – आवश्यक साहित्य पुरवठा व समन्वय.
- पशुधन विकास अधिकारी – निर्जंतुकीकरण व दैनंदिन अहवाल संकलन.
- पोलीस निरीक्षक – बाधित परिसरात नागरिकांच्या हालचालींवर नियंत्रण.
- तालुका आरोग्य अधिकारी – जलद कृती दलाची आरोग्य तपासणी व PPE किट पुरवठा.
- सार्वजनिक बांधकाम विभाग – मृत पक्ष्यांच्या विल्हेवाटीसाठी यंत्रसामग्री उपलब्ध करणे.
- वन विभाग व भूमी अभिलेख विभाग – स्थलांतरित पक्ष्यांवर देखरेख व योग्य विल्हेवाट प्रक्रियेसाठी सहकार्य.
प्रशासनाने बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी घबराट न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
- मद्यप्राशन केल्याचा संशय जिल्हा परिषदेतील ९ कर्मचाऱ्यांची अचानक चाचणी
- हायवेवरुन जाणाऱ्या वाहनावर चढुन चोऱ्या करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद
- लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
- धाराशिव-सोलापूर रेल्वे प्रकल्पाचा खर्च 900 कोटींवरून 3000 कोटींवर दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची माहिती
- मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात वाढ, पायाभूत प्रकल्पांना गती