धाराशिव (प्रतिनिधी) – वडिलांना झालेल्या मारहाणीप्रकरणी दखलपात्र गुन्हा नोंदवण्याऐवजी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने संतप्त झालेल्या माय-लेकराने थेट पोलिस ठाण्यातच विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. व्यंकटेश पडिले (वय २२) व त्यांची आई संगीता सतीश पडिले या दोघांना उपचारासाठी धाराशिव वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संगीता पडिले यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
नरसिंह सतीश पडिले यांनी काही दिवसांपूर्वी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताना, पैशाच्या कारणावरून त्यांच्या वडिलांवर एका व्यक्तीने मारहाण केल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात दखलपात्र गुन्हा दाखल न करता फक्त अदखलपात्र कलमान्वये गुन्हा नोंदवला. वारंवार विनंती करूनही पोलिसांनी दखलपात्र गुन्हा घेतला नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ व्यंकटेश व त्यांची आई संगीता यांनी आनंद नगर पोलिस ठाण्यातच विषारी पदार्थ प्राशन केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात खळबळ उडाली. दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
- रस्ते कामाच्या चौकशीसाठी एस आय टी नेमा,नगरविकास प्रधान सचिव गोविंदराजांच्या विरोधाभासी शिफारशींवर प्रश्नचिन्ह महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
- धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन
- जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!
- कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!
- धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
