पारा (राहुल शेळके ) रोजी झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेमध्ये वाशी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा पारा शाळेने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले आहे.शाळेतील कुमारी अफिफा अय्युब शेख व ऋषिकेश प्रवीण जाधव या दोन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.
दि 02ऑक्टोबर रोजी या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा तसेच मार्गदर्शक शिक्षक काकासाहेब बाबुराव गावखरे यांचा शाळा व शालेय व्यवस्थापन समिती पारा यांच्यातर्फे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश खोले, उपाध्यक्ष संजय भराटे, दैनिक जनमतचे पत्रकार राहुल शेळके, दत्तात्रय भराटे, दादाराव भराटे, जेष्ठ नागरिक बारीकराव शेळके , तसेच मुख्याध्यापक जोगदंड, रविंद्र गायकवाड ,कांबळे ,देशमाने ,पाळवदे मॅडम ,आयुब शेख , विशाल गायकवाड ,गिरी ,बनसोडे ,ठोंबरे ,फेरे ,भोसले मॅडम ,ओव्हाळ मॅडम यांच्यासह गावातील शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.
मार्गदर्शक शिक्षक काकासाहेब गावखरे यांनी आपल्या मनोगतातून नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तयारी व महत्त्व त्याचबरोबर पालकांची व विद्यार्थ्यांची जबाबदारी स्पष्ट केली, पालक या नात्याने शेख सर यांनी गावखरे सर यांचा सत्कार केला व आपल्या मनोगतातून त्यांचे आभार मानले. शालेय व्यवस्थापन उपाध्यक्ष संजय भराटे यांनीही शाळेच्या यशाबद्दल सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे आपल्या मनोगतातून समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
शेवटी शाळेचे उत्तम प्रशासक, मुख्याध्यापक यांनी अध्यक्षीय समारोप केला आणि आपल्या मनोगतातून शाळेच्या यशाची परंपरा अशीच वाढवण्याची ग्वाही दिली. देशमाने सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.