चोरीच्या 6 मोटारसायकलसह आरोपी अटकेत.

0
106

 

उस्मानाबाद – चोरीच्या सहा मोटारसायकलसह आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. विविध गुन्ह्यातील आरोपीच्या शोधार्थ स्था.गु.शा. चे पोनि-  गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि-  पवार, पोहेकॉ- कवडे, काझी, शेळके, पोना- घुगे, पोकॉ- सर्जे, जाधवर, कोळी यांचे पथक दि. 14 सप्टेंबर रोजीच्या पहाटे येरमाळा येथे गस्तीस होते. दरम्यान त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक तरुण येरमाळा येथील मोटारसायकल संशयीतरित्या बाळगुन आहे. यावर पथकाने येरमाळा- बीड महामार्गालगतच्या एका बंद असलेल्या रसायन निर्मीती कारखान्यामागे छापा टाकून त्या संशयीतास ताब्यात घेउन विचारपूस केली असता त्याचे नाव- योगेश अरुण कसबे, वय- 24 वर्षे, रा. हदगाव, ता. केज असल्याचे समजले. यावेळी त्याच्या ताब्यात आढळलेल्या 6 मोटारसायकलच्या मालकी- ताबा विषयी विचारपुस केली असता तो पोलीसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देत नसल्याने पथकाने वाहनांच्या सांगाडा व इंजीन क्रमांकावरुन शोध घेतला असता त्यातील 4 मोटारसायकल या पुणे जिल्ह्यातून चोरीस गेल्याने 4 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. उर्वरीत 2 मो.सा. या सुध्दा चोरीच्या असाव्यात असा पोलीसांना संशय असून उर्वरीत तपासकामी त्यास मोटारसायकलसह येरमाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here