घराचा पत्रा फाडून विज घरात घुसली,घराची मोठी पडझड

0
87

 

नाशिब बलवत्तर अपघात टळला कुटुंबात कोणासही इजा नाही मात्र कुटुंब भयभीत 

घरातील टीव्हीसंच  सह इतर जीवनावश्यक साहित्य जळून खाक

परंडा ( दि ३ ऑक्टोबर ) तालूक्यातील खासगावचे शेतकरी मधुकर सुदाम जगदाळे यांच्या घराचा पत्रा फाडून विज घरात घुसल्याने घरातील टीव्ही संचचा  स्फोट होऊन,मिक्सर कपाटासह  इतर जिवनवशक साहित्याचे जळुन नुकसान झाले ही घटना दि २ ऑक्टोबर रोजी रात्री ९-३० दरम्यान खासगाव येथे घडली.

       या अपतकालीन घटनेमुळे शेतकरी जगदाळे कुटूंबाचा थरकाप उडाला घरातील विद्युत उपकरणासह वायरींग बोर्ड सर्व जळून खाक झाल्याने भयभीत शेतकरी कुटूंबाला काळोखात रात्र जागुन काढावी लागली.

       मधुकर जगदाळे हे पत्नी  सुवर्णा मुलगा अजय व त्यांच्या घराच्या  शेजारील धनाजी शिंदे यांचा दिड वर्षाच्या नातु सह झोपले होते रात्री ९ वाजेच्या सुमारास वादळदी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली आणी कडकडती विज घराचा वरचा पत्रा फाडून घरात शिरली या मुळे घराची पडझड झाली तर घरातील टीव्ही संच,मीक्सर जळून खाक झाले तर कपाटाच्या काचा फुटून घरात काचेचा खच पडला तर घरातील अन्य धान्यांच्या वस्तु घरात विखुरल्या घराचा पत्रा फाडून घरात घुसलेली विज भिंला होलपाडुन बाहेर निघून गेली.

    या घटनेची माहिती मिळताच बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांनी खासगाव येथे सदर घराला भेट देऊन घराची पाहणी केली व शेतकरी मधुकर जगदाळे यांना तात्काळ ५ लाख रुपयाची आर्थीक मदत देन्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे नसीम पटेल , कानिफनाथ सरपने,भीमराव जाधव,फुलचंद ओव्हाळ,सचिन गायकवाड,रामा भोसले , विनायक होरे आदी उपस्थीत होते.खासगाव येथील शेतकरी जगदावे यांच्या घरावर विज पडल्याची माहिती मिळाल्याने राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अॅड.सुभाष वेताळ,गोविंद जाधव यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यास आर्थीक मदत मिळऊन देन्यासाठी मा.आ. राहूल मोटे यांच्या माध्येमातुन मंत्रलय स्तरावर प्रयत्न करू असे यावेळी सांगीतले.

   यावेळी ग्रामपंचायत सदस्य भारत थाटे,धर्मा जगदाळे,बबन दत्तू लिककर,पंडीत जगदाळे, पोलिस पाटील विठ्ठल सातपूते, धनाजी शिंदे,आदिंसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थिती होते.

        या घटनेची माहीती पोलीस पाटील विठठल सातपुते यांच्या मार्फत महसुल विभागाला मिळताच तहसिलदार देवनीकर यांच्या आदेशाने खासगाव सज्जाचे तलाठी विनोद चुकेवाडव यांनी घटना स्थळाचा व झालेल्या नुक्सानीचा पंचनामा केला आहे.यावेळी खासगाव ग्रामपंचायतीचे ग्रामशेवक उल्हास देवकते,बापु,जगदाळे व ग्रामस्थ उपस्थीत होते.



 जगदाळे यांच्या घरावर विज कोसळल्या मुळे जिवीत हानी झाली नाही मात्र घरासह घरातील जिवनवश्यक वस्तुचे मोठे नुकसान झाले आहे.

विजेच्या धक्याने घराच्या भिंतीना तडे जाऊन घराचा काही भाग कोसळला आहे.सद्या जगदाळे यांना आर्थीक मदतीबरोबरच घराची नितांत गरज आहे.त्यांना खासबाब म्हणुण अपत्ती वेवस्थापणातुन घरकुल मंजुर करावे आशी मागणी खासगाव ग्रामस्थातुन करण्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here