काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश

0
105

सलगरा,दि.९(प्रतिनिधी)

तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने तालुक्यामध्ये होत असलेल्या विविध विकास कामांचा, त्यांच्या मुळे होत असलेल्या अनेक सामाजिक कार्यांचा – उपक्रमांचा तसेच पाटील यांच्या कार्यप्रणालिबद्दल नागरिकांमधून आणि शेतकरी वर्गामधून व्यक्त होणाऱ्या सकारात्मक विचारांवर प्रभावित होऊन गावच्या विकासासाठी एकत्र आलेच पाहिजे, यासाठी या तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गावातील सर्वांना एकत्र केले.

गंधोरा येथील अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवार (दि.९) रोजी तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत उस्मानाबाद येथे त्यांच्या निवासस्थानी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांची, तरुणांची पक्षाला खूपच गरज आहे, तुम्ही आल्यामुळे ती गरज आता भरून निघेल अशा शब्दात आमदार पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भोसले, कमलाकर पाटील, अनिल पवार तसेच महादेव भोसले (माजी सदस्य), प्रवीण पाटील, अमोल मुसळे (माजी सदस्य), विद्यासागर देसाई महावीर भोसले, लिंबाजी सोनटक्के, परमेश्वर भोसले, पांडुरंग सोनटक्के, विनोद भोसले, दयानंद पाटील, सचिन शिंदे, रामेश्वर भोसले, रंगनाथ भोसले, पांडुरंग जाधव, विकास पाटील, आनंद गिरी, मधुकर राठोड, सुरज एकंडे, हनुमंत एकंडे, सत्यवान भोसले, लक्ष्मीकांत भोसले, रमेश देसाई, शिवाजी पाटील, शनिराज एकंडे, कुंडलिक भोसले, दत्तूराजे भोसले, उमेश पाटील, रामा भोसले यांच्या सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here