कळंब, ता. १० एप्रिल – आगामी 2025 ते 2030 या कालावधीसाठी कळंब तालुक्यातील एकूण 92 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ही आरक्षण सोडत तहसीलदार हेमंत ढोकले व उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
आरक्षण प्रक्रियेनुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 13 ग्रामपंचायती, अनुसूचित जाती महिलांसाठी 8 ग्रामपंचायती, अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती महिला मिळून 2 ग्रामपंचायती, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ना.मा.प्र.) 12 ग्रामपंचायती व त्यातील महिलांसाठी 14 ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत. उर्वरित 43 ग्रामपंचायती सर्वसामान्य व सर्वसामान्य महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
महत्त्वाची ग्रामपंचायती व त्यांचे आरक्षण प्रकार:
- अनुसूचित जाती प्रवर्ग: पिंप्री (शि), डिकसळ, जायफळ, वडगाव (शि), भाटशिरपूरा
- अनुसूचित जाती महिला: शिंगोली, पाथर्डी, देवळाली, बाभळगांव
- अनुसूचित जमाती: नागुलगांव
- अनुसूचित जमाती महिला: घारगांव
- ना.मा.प्र. प्रवर्ग: येरमाळा, शेलगाव दि, भोसा, आडसुळवाडी
- ना.मा.प्र. महिला: नायगांव, मलकापुर, हाळदगांव, शेळका धानोरा
- सर्वसाधारण महिला: रांजणी, पाडोळी, उपळाई, दाभा, गोविंदपूर
- सर्वसाधारण प्रवर्ग: ईटकुर, ढोराळा, आढाळा, बहुला
- धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन
- जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!
- कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!
- धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
- धाराशिव जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर
