दहिफळ (योगराज पांचाळ)
कळंब तालुक्यातील दहिफळ- परतापूर रस्त्यावर रात्रीच्या अकराच्या सुमारास रेडीमेड कपड्यांची वाहतुक करणाऱ्या कंटेनरला आग अचानक आग लागली यामध्ये लाखोंचा माल जळून खाक झाला असून मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, सोलापूरहून अंबाजोगाई कडे जाणारा कंटनेर दहिफळ परतापूर मार्गे कळंब कडे जात होता.बाभळगाव येथे ड्रायव्हरचे नातेवाईक होते जाता जाता भेटावे म्हणून या मार्गे रेडीमेड कपड्यांनी भरलेली गाडी रस्त्याने जात असताना गाडी रस्त्याच्या कडेला गेली गाडी वर घेताना टायर गरम होऊन टायरने पेट घेतला.पत्रा गरम झाल्यामुळे आतील कपड्याला आग लागली.काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केले गाडी पेटली.रात्रीची वेळ होती.जवळ वस्ती असल्यामुळे काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली जवळ शेतात असलेले बोअर चालू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला आग आटोक्यात आली नाही.
घटनेची माहिती मिळताच
वैभव काळे, तात्या भातलवंडे, मनोज गोरे,वैभव गायकवाड, गोपाळ शिंदे समाधान वाघमारे अतुल वाघमारे यांच्यासह
परतापुर दहिफळ बाभळगांव च्या २५-३० तरुणांनी तरुणांनी शर्तीचे प्रयत्न करुन आग विझवण्याचा प्रयत्न केला आग आटोक्यात येण्याजोगी नसल्याचे लक्षात येताच तुषार वाघमारे यांनी फोन करून पोलीस व अग्निशामक दलास पाचारण केले.
कळंब नगरपालीकेचे कर्मचारी महादेव हाजगुडे व गजानन जाधवर यांनी वेळीच धावून येत आग्निशामकच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.परंतू कपड्यांची राख रांगोळी झाली होती.लाखोंचा माल जळून खाक झाला आहे.
गाडीच्या आसपास मोठ्या प्रमाणात जनावरांचे गोठे, कडब्याच्या गंजी, सोलारपंप होते अग्नीशामक गाडी वेळीच आल्यामुळे मोठ्याप्रमाणात हानी टळली.
- रस्ते कामाच्या चौकशीसाठी एस आय टी नेमा,नगरविकास प्रधान सचिव गोविंदराजांच्या विरोधाभासी शिफारशींवर प्रश्नचिन्ह महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
- धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन
- जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!
- कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!
- धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
