उस्मानाबाद जिल्हा माताबाल संगोपन व लसीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये प्रथम स्थानी

0
110

 

उस्मानाबाद

राज्याच्या आरोग्य विभागांतर्गत कुटूंब कल्याण कार्यालय पुणे यांचे मार्फत मातावाल संगोपन आणि नियमीत लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध निर्देशांकांच्या कामाचे जिल्हा निहाय मुल्यमापन करुन जिल्हयांचा गुणानुक्रम ठरविण्यात येतो. चालू वर्षात माहे सप्टेंबर २०२१ अखेर झालेल्या कामाचा मुल्यमापन अहवाल नुकताच प्रकाशीत करण्यात आला असून सदर अहवालातील गुणनूक्रमानुसार उस्मानाबाद जिल्हा हा राज्यामध्ये ८३ गूण मिळवून प्रथम क्रमांकावर आलेला आहे.

सध्या सर्वत्र कोविड- १९ महामारीचा काळ असताना व कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दररोज कामकाज करत असताना जिल्हयातील सर्व आरोग्य संस्था व तेथील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी माताबाल संगोपन आणि नियमीत लसीकरण कार्यक्रमांच्या विविध निर्देशांकामध्ये जसे की, माता आरोग्य कार्यक्रम, बाल आरोग्य कार्यक्रम, नियमीत लसीकरण कार्यक्रम इत्यादी नॉन-कोविड कार्यक्रमात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता , यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंस्फुर्तीने दिलेल्या उधिष्टानुसार काम प्रामाणिकपणे करत आहेत. या बाबत डॉ. नितीन बोडके जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. धनंजय पाटील जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. कुलदीप मिटकरी जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी आणि डॉ. सचिन बोडके निवासी वैद्यकिय अधिकारी (बा.सं.) यांनी आरोग्य विभागांतर्गत जिल्हयातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांचे अभिनंदन करुन कामात सातत्य राखण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here