इस्लामपूर रेठरे धरण येथील आणखी सहा जणांची कोरोणा चाचणी निगेटिव्ह- जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी

0
246

तासगाव (राहुल कांबळे)-
रेठरे धरण येथे राहून गेल्या नंतर मुंबईत कोरोणाबाधित ठरलेल्या व्यक्तीशी संबंधित निकटवर्तीयांपैकी आणखी ६ जणांची कोरोणा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. 
रेठरे धरण येथील व्यक्ती मुंबईत गेल्यानंतर कोरोना बाधित असल्याचे निश्चित झाल्यानंतर प्रशासनाने गतिमान हालचाली करून निकटच्या संपर्क बाधितांना मिरज येथे आयसोलेशन कक्षातमध्ये दाखल केले.  कोरोना चाचणीसाठी स्वाब नमुने तपासणी करण्यात आले. यामध्ये एकूण ३० जणांची तपासणी करण्यात आली. यातील २४ जणांचे अहवाल पूर्वीच निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित ६ जणांचे अहवाल आज निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here