अधिकारी,कर्मचाऱ्यांना प्रतिकारशक्ती वाढविणारे आर्सेनिकम अल्बम 30 हे होमिओपॅथी औषध उपलब्ध करून द्या.–आ.राणाजगजीतसिंह पाटील

0
111



उस्मानाबाद –
कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यात शासनाचे हजारो कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत.कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पुढील काळात देखील याच पद्धतीने काम करावे लागणार आहे.त्यामुळे या सर्व आघाडीवर लढणाऱ्या बांधवांची प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक आहे.आयुष मंत्रालयाने प्रतिकारशक्ती वाढीसाठी ‘Arsenicum Album 30’ या होमिओपॅथी औषधाची शिफारस केली आहे.जिल्ह्यातील अधिकारी,कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी ‘Arsenicum Album 30’ औषध उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे केली आहे.
कोविड-१९ वर मात करण्यासाठी विविध स्तरावर आपण लढा देत आहोत. दि.१४मे  रोजी कळंब शहरातील एक महसुल कर्मचारी कोविड-१९ विषाणुने बाधीत झाल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु तो रुग्ण कोणाच्या संपर्कामुळे बाधीत झाला हे अद्दयाप स्पष्ट नाही. अशा उद्भवलेल्या आपतकालीन परिस्थितीत आपणास  दैनंदिन काम करावे लागणार आहे व त्यासाठी आपली प्रतिकार शक्ती वाढविणेही गरजेचे असल्याचे मत आ.पाटील यांनी व्यक्त केले आहे.
कोविड-१९ चा सामना करण्यासाठी भारत सरकारच्या  आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आयुर्वेदीक उपचारांसह प्रतिकारशक्ती वाढविणेसाठी होमिओपॅथी औषधांबाबत माहिती देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्रातील पोलीस खाते व राज्यातील अनेक ठिकाणी तसेच जगभर ‘Arsenicum Album 30′ या प्रतिबंधात्मक औषधांचा प्रतिकारशक्ती वाढविणेसाठी उपयोग करण्यात येत असल्याची माहिती आ.पाटील यांनी पत्राद्वारे दिली आहे.
या अनुषंगाने आ.पाटील यांनी  संबंधित तज्ञ डॉक्टर व अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असता सर्वांनी  प्रतिकारशक्ती वाढविणेसाठी ‘Arsenicum Album 30′ हे होमिओपॅथी औषध योग्य असल्याचे मत व्यक्त केलं आहे.त्यांनी आपल्या पत्रासोबत आयुर्वेद, योग्य व प्राकृतिक चिकित्सा, युनानी व होमिओपॅथी (आयुष) मंत्रालय, भारत सरकारचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिलेले पत्र पाठवले असून दर्जेदार औषधे उपलब्ध करुन देणाऱ्या नामांकीत उत्पादकांकडूनच हे औषध घेण्यात यावे असे त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे सुचवले आहे.
सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाभरात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस,आशा सेविका, पोलीस, महसूल, शिक्षक नगर विकास आणि ग्रामविकास आदी विभागाच्या सर्व अधिकारी/ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी प्रती कुटुंबसंख्या सरासरी ५ प्रमाणे गृहीत धरुन पहिल्या टप्प्यात १५००० कुटुंबांसाठी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या कोविड-१९ च्या निधीमधून Arsenicum Album 30′ हे होमिओपॅथी औषध उपलब्ध करून देण्याची मागणी आ.पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here