परंडा (दि. २२ जून) – ONGC कंपनीच्या सीएसआर (CSR) निधीतून परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी टोकण यंत्र, मानवचलीत बीजप्रक्रिया ड्रम आणि मोटारचलीत बीजप्रक्रिया ड्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी दिनांक २३ जून २०२५ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत टोकण यंत्र – १३, मानवचलीत बीजप्रक्रिया ड्रम – १३ आणि मोटारचलीत बीजप्रक्रिया ड्रम – ३ असे एकूण लक्षांक ठरविण्यात आले आहेत. अर्जांची संख्या लक्षांकाशी जास्त झाल्यास २४ जून रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात येईल, असेही लांडगे यांनी स्पष्ट केले.
अनुदानाचे स्वरूप खालील प्रमाणे आहे:
- टोकण यंत्रासाठी ९०% अनुदान किंवा कमाल ₹९,००० (यापैकी जे कमी असेल)
- मानवचलीत बीजप्रक्रिया ड्रमसाठी ९०% अनुदान किंवा कमाल ₹९,०००
- मोटारचलीत बीजप्रक्रिया ड्रमसाठी ९०% अनुदान किंवा कमाल ₹३५,५५०
टोकण यंत्राच्या वापरामुळे बियाण्यांची बचत आणि उत्पादनक्षमता वाढते, तर बीजप्रक्रिया ड्रमद्वारे अल्प कालावधीत कीटकनाशके व बुरशीनाशके मिसळून बीजप्रक्रिया करणे शक्य होते. त्यामुळे ही साधने शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
अर्ज सादर करताना तालुका कृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- प्रशासनाला बदनाम करणाऱ्या उपोषणकर्त्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचे निर्देश
- भूम-परंडा-वाशी पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा, आ. तानाजी सावंत यांचे वर्चस्व अबाधित
- “ प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” — पालकमंत्री प्रताप सरनाईक
- भूम तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानास सुरुवात
- परंड्यात वाळू घाट लिलावाचा ‘धडाका’; ३.०५ कोटींची विक्रमी बोली
