तासगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात व शांततेत साजरी

0
22

मा.खास. संजय काका पाटील व आम. रोहित दादा पाटील, नगराध्यक्षा सौ विजया बाबासाहेब पाटील यांनी केले अभिवादन

तासगाव प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती तासगाव येथे अत्यंत उत्साहात व शांततेत पार पडली,
सम्राट कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे वतीने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कांबळेवाडी व सम्राटअशोक नगर येथे भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तर मंडळाचे सनी कांबळे, शुभम कांबळे, तसेच युवा कार्यकर्त्यांनी त्यामध्ये रितेश कांबळे वेदांत कांबळे सुजल कांबळे निखिल धोत्रे प्रसाद कांबळे केतन कांबळे यांनी अंकलखोप येथून भिमज्योत आणली होती, २५ किलोमीटर धावत ही भिमज्योत तासगाव शहरांमध्ये साडेनऊ वाजता भिलवडी नाका येथे दाखल झाली होती यामध्ये शेकडो कार्यकर्तेने सहभाग नोंदवला होता,
सकाळी ठीक ८.३० वाजता तासगावचे लोकप्रिय तहसीलदार श्री अतुल पाटोळे साहेब यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पगुच्छ अर्पण करीत अभिवादन केले यावेळी भीमराव भाऊ भंडारे, दिलीप भाऊ पाटील, चव्हाण आबा उपस्थित होते, साडेनऊ वाजता सांगली जिल्ह्याचे माजी खासदार ज्यानी हा पुतळा उभारण्यासाठी प्रचंड मेहनत केली महाराष्ट्र शासन व नगरपालिकेच्या सहकार्यतून लोक समाज वर्गणीतून हा पुतळा उभा केला ते नेते मा.संजय काका पाटील त्यांच्यासोबत तासगावच्या प्रथम नागरिक सौ विजया बाबासाहेब पाटील, उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान,बाबासाहेब पाटील, युवा नगरसेवक रोहन भैय्या कांबळे, माजी उपनगराध्यक्षा तथा नगरसेविका सौ दिपालीताई पाटील, नगरसेविका सौ शिंदे मॅडम,सौ धोत्रे,श्रीमती धाबगुडे, गटनेते सतीश लिंबळे ज्येष्ठ नगरसेवक अनिलभाऊ कुत्ते संतोष आबा बेले, माजी नगरसेवक मोहन नाना कांबळे,नगरसेवक संदीप सावंत, संजय लुगडे, नगरसेवक, नगरसेविका सह तासगाव पालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विशाल टकले साहेब, पोलीस स्टेशनचे व नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते, यावेळी संविधान प्रत व शिवाजी कोण होते हे पुस्तक वाटप आप्पासाहेब कांबळे सर रवींद्र कामत , अनिल कांबळे विक्रांत कांबळे, महेंद्र कांबळे प्रमोद कांबळे, पत्रकार राहुल कांबळे इ उपस्थित होते
साडेनऊ वाजता आंबेडकर पुतळा येथे बुद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सांगली नाका येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्कल येथे बुद्ध वंदना घेऊन कांबळेवाडी येथेही भीम जयंती चे स्वागत करण्यात आले त्यानंतर सम्राट अशोक नगर येथे तरुण युवक महिला भगिनी आणि उत्स्फूर्त स्वागत केले,
तासगाव कवठेमंहकाळ मतदारसंघाचे युवा आमदार रोहित दादा पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी नगरसेविका सौ उषाताई दकांबळे, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, एडवोकेट गजानन खुजट, प्रमोद अमृतसगार, नगरसेवक अरुण साळुंखे,रोहन पवार जे.के.भाऊ कांबळे जितेंद्र कांबळे, रोहन कांबळे, अर्जुन थोरात निशिकांत देवकुळे प्रकाश देवकुळे, उपस्थित होते
सायंकाळी पाच वाजता सम्राट अशोक नगर येथून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते हे मिरवणूक कांबळेवाडी पागा गल्ली सांगली नाका डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्कल गुरुवार पेठ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सिद्धेश्वर रोड वरचे गल्ली अशा तऱ्हेने मिरवणुकीचे आयोजन सम्राट अशोक कला क्रीडा मंडळाचे वतीने करण्यात आले होते, मिरवणुकीमध्ये हजारो महिला युवक,आभाल वुध्द सहभागी झाले होते हे विशेष आहे, चालू वर्षी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या महिला भगिनी व समता सैनिक दल यांनी विशेष परिश्रम घेतले होते. मिरवणुकीमध्ये चित्ररथ हा सगळ्यांची नजर वेधून घेत होता,सर्व कार्यक्रम अत्यंत शांततेत पार पडला कोणतही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तासगावचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री विशाल टकले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here