मुंबई – राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून (PDS) अन्नधान्याचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मंगळवारी (दि. २६ ऑगस्ट २०२५) जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, दुकानदारांना मिळणारे सध्याचे ₹१५०/- प्रति क्विंटल (₹१५००/- प्रति मेट्रिक टन) मार्जिन आता वाढवून ₹१७०/- प्रति क्विंटल (₹१७००/- प्रति मेट्रिक टन) करण्यात आले आहे.
२०१७ मध्ये निश्चित करण्यात आलेल्या जुन्या दरानुसार दुकानदारांना केंद्र शासनाचा ₹४५/- व राज्य शासनाचा ₹१०५/- असा मिळून एकूण ₹१५०/- मार्जिन मिळत होते. वाढीव खर्च लक्षात घेऊन रास्त भाव दुकानदार संघटनांकडून सातत्याने मागणी केली जात होती. त्यानंतर १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या वाढीला मंजुरी देण्यात आली.
सुमारे ५३,९१० रास्त भाव दुकानदारांना या निर्णयाचा थेट लाभ होणार असून वाढीव खर्चाची तरतूद संबंधित अर्थसंकल्पीय शिर्षाखाली करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार ही वाढ तत्काळ लागू होणार आहे.
- धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन
- जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!
- कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!
- धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
- धाराशिव जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर
