मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज सामाजिक न्याय, नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, कामगार आदी विभागांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
🔹 सामाजिक न्याय विभाग
- संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या मासिक अर्थसहाय्यात ₹1000 ने वाढ.
- लाभार्थ्यांना दरमहा आता ₹2500 इतकी मदत मिळणार.
🔹 नगर विकास विभाग
- ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुणे मेट्रो मार्गिका 2 व 4, नागपूर मेट्रो टप्पा-2 यासाठी कर्जास मान्यता.
- पुण्यातील स्वारगेट–कात्रज मार्गावर बिबवेवाडी व बालाजीनगर ही दोन नवीन मेट्रो स्थानके उभारण्यास मंजुरी; 421 मीटरने कात्रज स्टेशन स्थलांतरित होणार. यासाठी ₹683 कोटींची तरतूद.
- पुणे–लोणावळा लोकलच्या तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेस राज्य सरकार MUTP धर्तीवर निधी उभारणार.
- ठाणे ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग (PPP तत्त्वावर) सिडकोमार्फत राबविणार.
- मुंबई मेट्रो मार्गिका-11 (वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया) प्रकल्पास ₹23,487 कोटींची तरतूद.
- नागपूर शहराभोवती बाह्य वळण रस्ता व 4 ट्रक-बस टर्मिनल उभारणीस मंजुरी.
- ‘नवीन नागपूर’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र (IBFC) विकसित करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हिंगणा तालुक्यात मंजूर.
- MUTP-3B प्रकल्पात राज्याचा 50% आर्थिक सहभाग निश्चित.
🔹 विधी व न्याय विभाग
- वांद्रे (पूर्व) येथील उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलासाठी ₹3,750 कोटींचा खर्च मंजूर.
🔹 ऊर्जा विभाग
- महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या वापराबाबत धोरण निश्चित.
🔹 कामगार विभाग
- महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, 2017 तसेच कारखाने अधिनियम, 1948 मध्ये सुधारणा.
🔹 आदिवासी विकास विभाग
- अनुसूचित जमातीतील नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्राची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू.
राज्यातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, सामाजिक न्याय व औद्योगिक विकासाला गती देणारे हे निर्णय असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
- धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन
- जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!
- कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!
- धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
- धाराशिव जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर
