धाराशिव – सणासुदीच्या आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने अवाजवी तिकीट दर आकारले जात असल्याचा गंभीर आरोप छावा संघटनेने केला आहे. या अन्यायकारक लुटीविरोधात छावा संघटनेतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, धाराशिव यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. राकेश पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र मोटर वाहन कायद्याने व परिवहन विभागाने ठरवलेले अधिकृत दर न पाळता काही खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाशांची आर्थिक लूट करीत आहेत. प्रवाशांकडून आकारले जाणारे अवाजवी दर पाहता सामान्य जनतेत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत :
- सणासुदीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरांवर काटेकोर नियंत्रण ठेवावे.
- जास्तीचे भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कठोर कारवाई करावी.
- अधिकृत भाडेदरांची यादी बसस्थानकांवर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात व संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी.
- विशेष तपासणी पथक नेमून अवाजवी दर आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सविरुद्ध कार्यवाही करावी.
- प्रवाशांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सक्रिय ठेवावी व त्यावर तत्काळ कारवाई करावी.
- काही ट्रॅव्हल्स परमिटशिवाय वाहने चालवत असून, फिटनेस, विमा व चालक परवाना नियमांचे पालन होत नाही.
प्रवाशांच्या आर्थिक व शारीरिक सुरक्षेच्या दृष्टीने या मागण्या तातडीने मान्य करून कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका छावा संघटनेने घेतली आहे.
- सर्वपक्षीय विरोधकांना टक्कर देत आमदार तानाजी सावंतांनी गड राखला
- विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या रस्त्यावर अपघात; दोन ट्रॅक्टर पलटी, दुकाने व नागरिक थोडक्यात बचावले
- पेट्रोल पंपाला दंड,धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल
- विदेशी दारू तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
- भाजपची हुजरेगिरी करणे महागात पडले, खोटी माहिती पसरवल्याने अखेर तीन सोशल मिडिया पेजवर गुन्हा दाखल, महाराष्ट्रात खळबळ!
