मुंबई, दि. २१ ऑगस्ट :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना १ सप्टेंबर २०२५ रोजी देय होणारे माहे ऑगस्टचे वेतन / निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन यावेळी गणेशोत्सवापूर्वीच, म्हणजे दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी देण्यात येणार आहे.
वित्त विभागाच्या मते, यंदा गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्टपासून होत आहे. त्यादृष्टीने कर्मचाऱ्यांना सण साजरा करताना आर्थिक अडचणी जाणवू नयेत म्हणून ही विशेष मुभा देण्यात आली आहे. शासनाने यासाठी मुंबई वित्तीय नियम, १९५९ व महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील संबंधित तरतुदी तात्पुरत्या स्वरूपात शिथिल केल्या आहेत.
शासन निर्णयानुसार –
- वेतन व निवृत्तिवेतन देयके २६ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित केली जातील.
- सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन व निवृत्तिवेतन देयके तत्काळ उपकोषागार/जिल्हा कोषागार/अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथे सादर करणे आवश्यक आहे.
- या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदांचे अधिकारी-कर्मचारी, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी व अकृषी विद्यापीठे तसेच त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांतील कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांनाही मिळणार आहे.
या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हा कोषागार व उपकोषागार कार्यालयांना तातडीने सूचना देण्यात आल्या आहेत.
👉 यामुळे लाखो सरकारी अधिकारी-कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना गणेशोत्सवात दिलासा मिळणार आहे.
- धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन
- जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!
- कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!
- धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
- धाराशिव जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर
