आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण
परंडा (भजनदास गुडे ) राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत दि२७ जुलै रोजी परांडा तालुक्याच्या दौऱ्यावर होते.या दौऱ्यादरम्यान मंत्री प्रा.डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते तालुक्यातील विविध ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले.
आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी परंडा, भूम,वाशी मतदारसंघाच्या विकास कामासाठी हजारो कोटीचा निधी शासन दरबारी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून परंडा मतदारसंघात विविध विकास कामांना सुरुवात झाली असून काही कामे पूर्णत्वाकडे आली आहेत.

दि२६जुलै रोजी आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत परंडा तालुक्याच्या दौऱ्यावर होते.यावेळी डॉ.सावंत यांच्या दौऱ्याची सुरुवात मुगाव येथून झाली.या ठिकाणी प्रा.डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या हस्ते मुगाव येथील विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.त्यानंतर डोंजा येथून देऊळगावकडे जाणाऱ्या ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.गेल्या अनेक वर्षापासून गोसावीवाडी ते आलेश्वर हा रस्ता व्हावा अशी मागणी ग्रामस्थ करत होते.मात्र अनेक वर्षापासून खितपत पडलेला रस्त्याचा प्रश्न पालकमंत्री डॉ.सावंत यांनी तातडीने सोडवला.गोसावीवाडी आलेश्वर ५ किलोमीटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ डॉ सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सावंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सुरुवात झाली.
यावेळी गोसावीवाडी आलेश्वर येथील ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करत शुभारंभ कार्यक्रम स्थळी आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांचा सत्कार केला.तांदुळवाडी या ठिकाणी पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते जन सुविधा योजनेअंतर्गत सभागृहासह नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी सावंत यांनी तांदुळवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.
सायंकाळी वाटेफळ, हिंगणगाव खुर्द येथे गाव भेट दिली.सावंत यांच्या हस्ते जगदाळवाडी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण करण्यात आले.रात्री आठच्या सुमारास फटाक्यांच्या आतिषबाजीत इनगोदा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सावंत यांनी ग्रामस्थांशी विविध विषयावर चर्चा केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, विकासरत्न तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे सर,शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गौतम लटके सर,ॲड सुभाष मोरे,शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणे,उद्योजक काकासाहेब साळुंके,सतीश दैन, प्रशांत खरसडे यांच्यासह शिवसैनिक,ग्रामस्थ मोठया संख्यांने उपस्थित होते.
- विठ्ठल दर्शनासोबत आधुनिक शेतीचे पंढरीत दर्शन (श्रीमंत सुधाकरपंत परिचारक कृषी महोत्सवाचा जय्यत तयारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन)
- पि.एम.श्री.जि.प.कें.प्रा.पारा शाळेतील पोषण आहारात अळ्या आढळल्याचा पालकांचा आरोप; अन्न व औषध पथकाकडून अन्नधान्याची तपासणी
- १३ वर्षांची प्रतीक्षा संपली; तासगाव बायपास रस्ता भूसंपादनाला अखेर गती
- मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने नूतन एमआयडीसीत ₹1100 कोटींची गुंतवणूक होणार – आम.रोहीत पाटील
- शेतीच्या वादातून चुलत्याचा खून; डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार
