मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य या बैठकीस उपस्थित होते.
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ राज्यातील शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट
▪️ शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय
▪️ या संचामध्ये प्रत्येकी १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश
▪️ १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार
▪️ यासाठी येणाऱ्या ५१३ कोटी २४ लाख खर्चास मान्यता
✅आपत्ती व्यवस्थापनातील कामांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र, राज्य सरकारच्या कंपन्यांना नेमणार
▪️ आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमण्याचा निर्णय
▪️ या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून ‘टर्न की’ तत्त्वावर नेमणार
▪️ सामजंस्य करार करण्यात येऊन कंपन्यांना थेट नियुक्तीने कामे देणार
✅राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज मिळणार
✅नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती मिळणार. सुधारित खर्चास मान्यता
▪️ या प्रकल्पाचा पूर्णत्व खर्च ८६८० कोटी रुपयांमध्ये वाढ झाल्याने ९२७९.०६ कोटींच्या सुधारित प्रकल्प खर्चास सुधारित मान्यता
▪️ या प्रकल्पासाठी ६२२ कोटी रुपये महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनला बिनव्याजी दुय्यम कर्ज देण्यास मान्यता
▪️ या प्रकल्पामध्ये ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान मार्गिका क्र.१ व प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर ही मार्गिका क्र.२ अशा एकूण ३८.२१५ कि.मी. लांबीच्या दोन मार्गिकांचा व ३८ स्थानकांचा समावेश
✅ सुरेवाडा उपसा सिंचन योजनेला ३३६.२२ कोटींची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता
▪️ भंडारा तालुक्यातील सुरेवाडा गावाजवळ वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर होणार ही योजना
▪️ भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील २८ गावांना या योजनेचा होणार फायदा
▪️ या उपसा सिंचन योजनेतून ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
✅ उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देणार. खर्चास सुधारित मान्यता
▪️ उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना संजीवनी मिळणार
▪️ प्रकल्पाच्या सुमारे ११७३६.९१ कोटी रुपये इतक्या किंमतीस मान्यता
▪️ मराठवाड्यातील २ जिल्ह्यातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील १३३ गावांतील १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार
▪️ प्रथम टप्प्यात ७ अ.घ.फू. व दुसऱ्या टप्प्यात १६.६६ अ.घ.फू. असे एकूण २३.६६ अ.घ.फू. पाणी वापर.
▪️ उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, लोहारा व उमरगा तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला लाभ होणार.
