उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली शिवारातील निरंजन पांडुरंग सपकाळ यांच्या शेतातील विहिरीमधील विद्युत मोटार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. सदरील शेतकरी निरंजन सपकाळ हे आपल्या शेतीवरच उपजीविका भागवतात शेतामधून पिकाला पाणी देण्यासाठी शेतामध्ये विहीर व बोर असून सध्या बोर बंद आहे. विहीरीवर विद्युत मोटरीचे कनेक्शन असून त्यावर पाणबुडी चे कनेक्शन असून टेक्समो पाच एचपी कंपनीची मोटर बसवलेली आहे. दिनांक ३१ मे रोजी शेतामध्ये जाऊन शेवग्याच्या झाडाला मोटर चालू करून पाणी दिले व संध्याकाळी इलेक्ट्रिक मोटर बंद करून सदरील शेतकरी घरी परतले दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतकरी शेतामध्ये गेले असता त्या ठिकाणी विहिरीवरील मोटर मोटरीचा पाईप कापलेला दिसून आला मोटरी चा शोध घेतले असता विहिरीच्या आजूबाजूला मोटार दिसून आले नाही यावरून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी विहिरीतील मोटार चोरून नेल्याचे लक्षात आले. विहिरीवरील मोटर व केबल वायर हे दोन्ही अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले हे समजताच संबंधित शेतकऱ्यांनी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले व सदरील घटनेची माहिती पोलिस ठाण्यांमध्ये देऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.