उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथे दरवर्षी प्रमाणे पावसाळ्यापूर्वी गावातील नाल्यांची साफसफाई करण्याचे काम चालू आहे. तसेच गावात ज्या भागात पाणी साचते अशा भागातील साफसफाई करून घेणे गरजेचे असते त्यामुळे गावातील नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. तसेच पावसाळ्यात गावातील व परिसरातील लाईटचा घोटाळा होऊ नये म्हणून तारे जवळची झाडांचे फंटे तोडून घेणे अशा विविध कामांची स्वतः सरपंच प्रशांत रणदिवे यांनी कामाचा आढावा घेऊन सर्व कामे व्यवस्थित करून घेण्यास गेलल्या पंधरा दिवसांपासून चालू आहे.